Ahilyanagar School News : 'विद्यालयात लोकशाही पद्धतीने निवडणूक'; भैरवनाथ विद्यालयात झाली विद्यार्थी प्रतिनिधी निवड
School Elections News Maharashtra : संस्थेचे कार्याध्यक्ष सुहास शेळके व मुख्याध्यापिका वैशाली शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि उत्साहपूर्ण वातावरणात झाली. निवडणुकीत प्रचार व मतदारांना आपली भूमिका उमेदवार मांडीत होते.
Students casting votes in the democratic election at Bhairavnath Vidyalaya to choose their class representatives.esakal
टाकळी ढोकेश्वर : पळवे खुर्द (ता. पारनेर) येथील भैरवनाथ विद्यालयात नुकतीच लोकशाही पद्धतीने विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक पार पडली. विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्ये रुजवण्याच्या उद्देशाने आयोजित या निवडणुकीत शाळा आणि वर्ग प्रतिनिधी निवडण्यात आले.