

Municipal health officials inspect water storage sites during the Dengue-Free Ahilyanagar campaign.
esakal
अहिल्यानगर: महापालिकेच्या ‘डेंगीमुक्त अहिल्यानगर’ अभियानाअंतर्गत आतापर्यंत शहरातील १४ हजार ८०० घरांमधील पाणीसाठ्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३७० पाणीसाठ्यांमध्ये डोंगीसदृश अळ्या आढळून आल्या आहेत. संबंधित ठिकाणी औषध व धूरफवारणी करण्यात आली असून, पाणीसाठ्यांमध्ये ॲबेट औषध टाकण्यात आले आहे. महापालिकेने केलेल्या जनजागृतीमुळे डेंगी रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे, अशी माहिती आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली.