esakal | नगर- सोलापूर महामार्गाच्या भूसंपादनाचा पहिला हप्ता शेतकऱ्याच्या खात्यात जमा
sakal

बोलून बातमी शोधा

Deposits for land acquisition of Solapur Nagar Highway in the account of farmers in Shrigonda taluka

सोलापूर- अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गाच्या चौफदरीकरणासाठी भूसंपादन केलेल्या श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव, तरडगाव, मांडवगण, बनपिंप्री या गावातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत.

नगर- सोलापूर महामार्गाच्या भूसंपादनाचा पहिला हप्ता शेतकऱ्याच्या खात्यात जमा

sakal_logo
By
अशोक निंबाळकर

अहमदनगर : सोलापूर- अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गाच्या चौफदरीकरणासाठी भूसंपादन केलेल्या श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव, तरडगाव, मांडवगण, बनपिंप्री या गावातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. या महामार्गासाठी केंद्र सरकारकडून पहिला हप्ता मिळाला असल्याचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी सांगितले.

अहमदनगर ते सोलापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी कर्जत व श्रीगोंदा तालुक्यात भूसंपादन करण्यात येत आहे. यातूचन श्रीगोंदा तालुक्यात केलेल्या भूसंपादनासाठी केंद्र सरकारकडून पहिला हप्ता मिळाला आहे. हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात भूसंपादन अधिकाऱ्यांनी वर्ग केला आहे.

नगर जिल्ह्याच्या दृष्टीने अहमदनगर ते सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग महत्त्वाचा आहे. श्रीगोंदा तालुक्यात भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून प्रांताधिकाऱ्यांनी मंजूर केलेल्या निवाड्याप्रमाणे भारतीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता.
या प्रस्तावांना मंजुरी देऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने भूसंपादनापोटी ५० कोटीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यासाठी मंजूर केल्याचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी सांगितले.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे प्रकल्प संचालक पी. बी. दिवाण म्हणाले, महामार्गाच्या कामासाठी श्रीगोंदा तालुक्यातील बनप्रिंप्री, तरडगाव, मांडवगण व घोगरगावमधील जमिनींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर