esakal | रोहित पवार-राम शिंदे चौंडीत एकत्र, चर्चाही झाली...पण उद्या हे घडणारच
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit Pawar and Ram Shinde together in Choundi

दोघांमध्ये हा संवाद सुरु असताना माजी मंत्री, अण्णासाहेब डांगे या नेत्यांना न्याळत होते. या निमित्ताने झालेला हा संवाद मतदारसंघासाठी हितावह ठरणार आहे, हे मात्र निश्चित. परंतु...

रोहित पवार-राम शिंदे चौंडीत एकत्र, चर्चाही झाली...पण उद्या हे घडणारच

sakal_logo
By
वसंत सानप

जामखेड : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंती उत्सवानिमित्त चौंडीत माजी मंत्री राम शिंदे आणि आमदार रोहित पवार पुन्हा एकत्र आले. आणि काही गोष्टींवर चर्चाही केली. दोन राजकीय विरोधक एकत्र आल्यावर चर्चा तर होणारच !  केवळ ही चर्चा मतदारसंघापुरतीच नाही तर ती संपूर्ण राज्यभर सुरू आहे.

रविवार (ता.31)पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या 295 वी जयंतीच्या निमित्ताने आमदार रोहत पवार चौंडीला आले होते . यावेळी माजी मंत्री राम शिंदे आणि अण्णा डांगे चौंडीत उपस्थितीत होते. यावेळी शिंदें-पवारांनी आहिल्यादेवींच्या स्मृतिस्तंभाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या दरम्यान मिळालेल्या वेळेत 'कुकडी' च्या आवर्तनाबाबत दोघांमध्ये चर्चा रंगली.  

हेही वाचा - अर्बन बँकेवर रिझर्व्ह बँकेची कारवाई

आमदार रोहित पवार यांनी माजी मंत्री शिंदेंना सांगितले की, शनिवारी 6 जून ला 'कुकडी' चे पाणी सोडतोय, विरोधी पक्षाच्या भूमिकेत असलेले माजी मंत्री शिंदे लगेच त्यांना म्हणाले,'' येईल का पण ? त्यावर आमदार पवारांनी पुन्हा म्हणाले, हो येईल ना नक्की!

दोघांमध्ये हा संवाद सुरु असताना माजी मंत्री, अण्णासाहेब डांगे या नेत्यांना न्याळत होते. या निमित्ताने झालेला हा संवाद मतदारसंघासाठी हितावह ठरणार आहे, हे मात्र निश्चित.

माजी मंत्री शिंदे-आमदार पवारांची चौंडीत दुसरी भेट

दुसऱ्यांदा चौंडीत माजी मंत्री शिंदे आणि आमदार पवार एकत्र आले. या पूर्वी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्याच दिवशी रात्री नऊ वाजता आमदार रोहित पवार यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार राम शिंदेंच्या पराभवानंतर त्यांच्या निवास्थानी जाऊन शिंदेंची भेट घेतली. शिंदेच्या आई-वडिलांचे आशीर्वाद घेतले होते. ही भेट राज्यभर चर्चेची ठरली होती. आमदार पवारांनी दाखविलेला सुसंस्कृतपणा अनेकांना भावला होता.तसेच माजी मंत्री शिंदेंनी त्यांचा फेटा बांधून केलेला सत्कार खिलाडू राजकारण्याचे प्रतीक ठरला होता.या प्रसंगी दोघांच्या कार्यकर्त्यांची फौज सोबत होती.त्यांनी तो क्षण अनुभवला होता.
आज रविवारी (ता.31) रोजी सकाळी नऊ वाजता दुसऱ्यांदा हा योग येथेच जुळून आला. दोघांसोबतही दोघांच्या कार्यकर्त्यांची फळी यावेळीही होती. 

वास्तविक, दोन राजकीय नेते एकत्र आले की घोषणाबाजी, भांडणे होतात. मात्र, कर्जत-जामखेडमध्ये तसे होत नाही. दोघेही नेते शालिनतेचे दर्शन घडवित आहेत. ते कार्यकर्त्यांमध्ये परावर्तीत होत आहे.

  
'कोरोना' च्या पार्श्वभूमीवर 
चौंडी (ता. जामखेड) येथे दरवर्षी होणारा आहिल्यादेवीच्या जयंती उत्सवाचा जाहीर कार्यक्रम यावर्षी रद्द करण्यात आला. जयंती साध्या पद्धतीने  साजरी करण्यात आली. माजी मंत्री राम शिंदे माजी मंत्री अण्णासाहेब डांगे आमदार रोहित पवार, अक्षय शिंदे, अविनाश शिंदेंच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करण्यात आला.

दरवर्षी माजी मंत्री राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जयंती उत्सवाचा कार्यक्रम चौंडी (ता. जामखेड) येथे संपन्न होतो. यानिमित्ताने राज्याच्या विविध भागातून अहिल्यादेवी भक्त येथे हजेरी लावतात .

राज्याच्या मंत्रिमंडळातील काही मान्यवरांचीही या कार्यक्रमाला निमंत्रित केले जाते. तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंचवीस वर्षापासून स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती असायची. त्यांच्या पश्चात त्यांच्या कन्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या ही या कार्यक्रमाला हजेरी लावत. मात्र, यावर्षी कोरोणाच्या पार्श्वभूमीवर जाहीर कार्यक्रम रद्द करण्यात आल्याने नेते आपल्या सोयीनुसार स्वतंत्ररीत्या येथे येऊन अहिल्यादेवीला अभिवादन करीत आहेत.

सात वर्षानंतर कुकडीसाठी शिंदेंचे आंदोलन 

कुकडीच्या आवर्तनासाठी सोमवारी होणाऱ्या उपोषणावर माजी मंत्री राम शिंदे ठाम आहेत. रविवारी (ता.31) रोजी चौंडी  येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंती उत्सवानिमित्त माजी मंत्री राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्यात 'कुकडी' च्या आवर्तन संदर्भात संवाद झाला असला तरी माजी मंत्री राम शिंदे हे ठरलेल्या नियोजित आंदोलनावर ठाम आहेत.  कर्जत तहसील कार्यालयासमोर ते अकरा वाजता उपोषणास बसणार आहेत.

loading image