
Deputy CM Ajit Pawar in action mode — notice to be issued to MLA Sangram Jagtap for alleged indiscipline.
Sakal
अहिल्यानगर: ‘दिवाळीचे साहित्य हिंदूंच्याच दुकानांतून खरेदी करावे,’ अशा अशयाचे वक्तव्य आमदार संग्राम जगताप यांनी एका आंदोलनादरम्यान केले. याची दखल राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने घेण्यात आली आहे. जगताप यांना कारणे दाखवा नोटीस बजावणार असल्याचे पक्षाचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे जगताप यांच्यावर पक्षाकडून केव्हा कारवाई होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.