
अहिल्यानगर: चिचोंडी पाटील (ता.नगर) येथील धनगर समाजाच्या ७० वर्षीय कौसाबाई मारुती सरोदे यांच्या ५१ गुंठे जमिनीचा सात- बारा उताऱ्यावरील नाव बेकायदेशीर कमी करण्यात आले होते. या अन्यायाविरोधात सरोदे कुटुंबीयांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण केले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलनाची दखल घेत कार्यवाही करण्याचे निर्देश महसूल प्रशासनाला दिले. सरोदे यांच्या नावाची नोंद सातबारा उताऱ्याला लागल्यानंतर त्यांच्या हस्ते सात-बारा उतारा देण्यात आला.