
शरिरास अपायकारक असलेल्या खाद्यपदार्थ विक्रीस राज्यात बंदी असताना, शहरातील कोठला परिसरात अवैधरीत्या मावाविक्री सुरू असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्या पथकाला मिळाली.
अहमदनगर : शहरातील कोठला परिसरातील एका मावाविक्रेत्याला पोलिस उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्या पथकाने पकडले. त्याच्याकडून 24 हजार 880 रुपयांची सुगंधित तंबाखू, पानमसाला जप्त केला. शाहीद फारुख शेख (वय 21, रा. कोठला मैदान, नगर) असे त्याचे नाव आहे. शरिरास अपायकारक असलेल्या खाद्यपदार्थ विक्रीस राज्यात बंदी असताना, शहरातील कोठला परिसरात अवैधरीत्या मावाविक्री सुरू असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्या पथकाला मिळाली.
हे ही वाचा : बहुमत असूनही आरक्षण न निघाल्याने अनेक गावांत नाराजी
त्यानुसार पोलिस पथकाने छापा घालून वरील आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मावा बनविण्याचे साहित्य, तसेच 24 हजार 880 रुपयांची सुगंधित तंबाखू, पानमसाला जप्त केला. याबाबत पोलिस नाईक गणेश चव्हाण यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई पोलिस नाईक सचिन मिरपगार, सचिन जाधव, बाबा फसले आदींच्या पथकाने केली.