esakal | सरकार पवारांचेच, त्यांना वशिल्याची गरज काय; गृह राज्यमंत्र्यांची स्तुतिसुमने
sakal

बोलून बातमी शोधा

Development work will be done in Rohit Pawar's constituency - Desai

कोरोना काळात कर्तव्य करीत असताना कामाचा अतिरिक्त ताण पोलिसांवर पडत असल्याने अनेक जवान शहीद झाले. यासाठी लवकरच ताण कमी करण्यासाठी मोठी पोलीस भरती सुरू करण्यात आली.

सरकार पवारांचेच, त्यांना वशिल्याची गरज काय; गृह राज्यमंत्र्यांची स्तुतिसुमने

sakal_logo
By
नीलेश दिवटे

कर्जत ः आमदार रोहित पवार हे दूरदृष्टीचे नेतृत्व आहे. त्यांच्या पाठपुराव्यातून कर्जत-जामखेडमध्ये अद्ययावत अशी पोलीस निवासस्थाने उभारली जात आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे गृह राज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

हेही वाचा - भाजपच्या अनुसूचित जमातीच्या राष्ट्रीय मंत्रीपदी पिचड

कर्जत येथे पोलीस वसाहतीचे भूमिपूजन प्रसंगी बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक मनोज पाटील, आमदार रोहित पवार, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र दळवी, दीपक शहाणे, बळीराम यादव, उपजिल्हाध्यक्ष प्रवीण घुले, समाज कल्याण समिती सभापती उमेश परहर, सभापती अश्विनी कानगुडे, पोलीस गृहनिर्माणचे दीपाली भाईक, प्रांताधिकारी अर्चना नष्टे, पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, तहसीलदार नानासाहेब आगळे, बारामती ऍग्रोचे राजेंद्र पवार, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव आदी उपस्थित होते.

मंत्री देसाई म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्वात प्रथम पोलिसांच्या घराची अवस्था सुधारली पाहिजे. यासाठी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. राज्य सरकारच्या अर्थ संकल्पात पोलिस विभागासाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.

यासाठी आमदार अजित पवार यांचेदेखील सहकार्य मिळाले आहे. पोलिस प्रशासनास चांगल्या सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. कोरोना काळात कर्तव्य करीत असताना कामाचा अतिरिक्त ताण पोलिसांवर पडत असल्याने अनेक जवान शहीद झाले. यासाठी लवकरच ताण कमी करण्यासाठी मोठी पोलीस भरती सुरू करण्यात आली. यासह पोलीस विभागाला चांगली आणि सुसज्ज वाहने उपलब्ध करण्यात आली. आमदार पवार यांच्याकडे कर्जत-जामखेड मतदारससंघासाठी दूरदृष्टी आहे. मतदारसंघासाठी काम कसे करायचे हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. त्यांना कुणाच्या वशिल्याची गरज नाही. ते स्वतःच कामे मंजूर करून आणतात. तुम्हाला काही कमी पडणार नाही, अशी स्तुतीसुमनेही गृह राज्य मंत्री देसाई यांनी उधळली.

आपलेच आशीर्वाद

पवार म्हणाले की, तालुक्याच्या विकासकामांत अधिकाऱ्यांचे योगदान महत्वपूर्ण असते. त्याच पार्श्वभूमीवर आज पोलीस वसाहत भूमिपूजन कार्यक्रम पार पडत आहे. प्रत्येक विभागासाठी वसाहत उभारण्याचा मानस आमदार पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

तालुक्याच्या विकासासाठी लोकांनी आपल्याला निवडून देण्याचे काम केले आ,हे त्याच आशीर्वादावर कर्जत-जामखेड मतदारसंघाचा विकास करण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. जिल्हा पोलिस दलासाठी आगामी काळात २० वाहने महाराष्ट्र राज्य सरकारने उपलब्ध केली आहेत. महिलांसाठी भरोसा सेल मतदारसंघात स्थापन करून भयमुक्त वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यासाठी नागरिकांनीदेखील पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन आमदार पवार यांनी केले आहे.

कर्जत-जामखेडसाठी सीसीटीव्ही कॅमेरा उपलब्ध करण्याची मागणी देसाई यांच्याकडे करण्यात आली. सिद्धटेक पोलीस चौकी लवकरच मागणी पूर्ण होईल यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. 

पोलीस अधीक्षक मनोज पाटील म्हणाले की, आजचा दिवस पोलीस कुटुंबियांसाठी आनंदाचा क्षण आहे. त्यांच्या घराचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे. दोन पोलीस अधिकारी आणि ३६ पोलीस कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने साकार होणार आहेत. आभार पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी मानले. 

सर्वपक्षीय नेत्यांची हजेरी

यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके,  शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र दळवी, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, शिवसेना तालुका प्रमुख दीपक शहाणे, नगरसेवक बापूसाहेब नेटके, सभापती अश्विनी कानगुडे, सुनील शेलार, नानासाहेब निकत, भास्कर भैलुमे, प्रा विशाल मेहत्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र गुंड, बिभीषण खोसे, अशोक जायभाय, सतीश पाटील, रजाक झारेकरी, नगरसेविका मनीषा सोनमाली, डॉ शबनम इनामदार, राजेश्वरी तनपुरे, तात्या ढेरे आदी उपस्थित होते.

संपादन - अशोक निंबाळकर

loading image