आमदार नसतानाही भाजपने पिचड यांना दिले मंत्रिपद

Vaibhav Pichad as National Minister of BJP Scheduled Tribes Morcha
Vaibhav Pichad as National Minister of BJP Scheduled Tribes Morcha

अकोले : एकेकाळी राष्ट्रवादीचे बलाढ्य नेते म्हणून महाराष्ट्राला ज्या पिचड कुटुंबाची ओळख होती ते निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये गेले. तेथे मात्र, त्यांना पराभव पत्करावा लागला. असे असले तरी भाजपने त्यांच्याबाबत हात आखडता घेतलेला नाही. त्यांना मंत्रिपद देण्यात आले आहे.

भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या राष्ट्रीय मंत्रिपदी महाराष्ट्रातून एकमेव माजी आमदार वैभव पिचड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

त्यासंबंधीचे पत्र त्यांना पक्षाच्या वतीने देण्यात आले. दूरध्वनीवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. 
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रातील आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर आवाज उठवून सरकारला धारेवर धरीत खावटी कर्ज, रोजगार, स्वस्त धान्य, "मनरेगा'मार्फत रोजगार, आदिवासी संघटन, वीजबिल, ऑनलाइन शिक्षण, आदिवासींचे कुपोषण, पोषणआहार, वनजमिनी प्रश्न, शेतीला पाणी, उपसासिंचन योजना, आरक्षण अशा विविध प्रश्नांवर सडेतोड मत व्यक्त करीत सरकारला हे प्रश्न मार्गी लावण्यास भाग पाडले.

त्यांच्या कामाची दखल घेऊन भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी महाराष्ट्रातून त्यांच्या कामाचा अहवाल घेत त्यांची राष्ट्रीय मंत्री म्हणून नियुक्ती केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com