
शिर्डी : समृद्धी महामार्ग, नियोजित शिर्डी औद्योगीक वसाहत, साई थिम पार्क आणि शिर्डी विमानतळाच्या विस्तारासाठी दिलेला निधी या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डी विधानसभा मतदारसंघाला दिलेल्या अनमोल भेटी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली देश आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची प्रगतीकडे घोडदौड सुरू आहे, असे प्रतिपादन जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.