esakal | हा तर मुलांच्या जीवाशी खेळ; शालेय पोषण आहारात सापडला प्लॅस्टिकसदृश तांदूळ
sakal

बोलून बातमी शोधा

plastic rice

शालेय पोषणआहारात प्लॅस्टिकसदृश तांदूळ; नमुना तपासणीसाठी

sakal_logo
By
गौरव साळुंखे

श्रीरामपूर (जि.अहमदनगर) : सरकारकडून डिसेंबर २०२० ते एप्रिल २०२१ कालावधीतील तांदूळ (rice) सरकारी शाळांना प्राप्त झाला आहे. त्याचे वाटप देखील करण्यात आले आहे. सूतगिरणी येथील प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी शासकीय नियोजनाप्रमाणे विद्यार्थ्यांना तांदळाचे वाटप केले. त्यानंतर माता पालकांनी शिजविण्यासाठी सदर तांदूळ घेतला. तेव्हा त्यात काही प्रमाणात प्लॅस्टिक सदृश तांदूळ (plastic rice found) असल्याचे समोर आले. त्यावर त्यांनी थेट पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी संजीवन दिवे यांच्याकडे तक्रार केली. दिवे यांनी तांदळाचे नमुने ताब्यात घेऊन त्याची तपासणीसाठी जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत नुकतेच पाठविले आहे. त्यामुळे या तपासणी अहवालाकडे पालकांचे लक्ष लागले आहे. (Plastic-like-rice-in-school-nutrition-marathi-news-jpd93)

पालकांना प्लॅस्टिकसदृश तांदूळ

शालेय पोषण आहारात येथील सूतगिरणी परिसरातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना नुकतेच तांदूळवाटप झाले. मात्र, या तांदळामध्ये काही महिला पालकांना प्लॅस्टिकसदृश तांदूळ आढळल्याने त्यांनी गटशिक्षणाधिकारी संजीवन दिवे यांच्याकडे याबाबत तक्रार केली. त्याची दखल घेत गटशिक्षणाधिकारी दिवे यांनी नगर येथील जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत या तांदळाचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. कोरोना संसर्गापूर्वी विद्यार्थ्यांना शाळेत पोषणआहार शिजवून दिला जात होता. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना तांदळाचे थेट वाटप केले जात आहे.

हेही वाचा: …तर नाशिक, कोपरगावात चिपळूणची पुनरावृत्ती; जलतज्ज्ञ चितळेंच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष

हेही वाचा: चिमुरड्याच्या डोळ्यांदेखत पित्याचा मृत्यूतांडव; क्रूर नियती

loading image
go to top