कोरोनाकाळातही श्री क्षेत्र देवगडला भाविक, पर्यटकांची झुंबड

सुनील गर्जे
Saturday, 19 September 2020

श्रीक्षेत्र देवगड (ता. नेवासे) देवस्थसनच्या प्रसिद्ध पत्रकात करोना संकटामुळे संपूर्ण भारतभर वेगळ्या उपाय योजना राबवित आहे. मठ, मंदिर, देवालये व इतर धार्मिक स्थळे खुली करण्याबाबत शासनाने अद्यापपर्यंत कुठेलेही निर्देश जारी केलेले नाहीत.

नेवासे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवालय बंद असल्याने दर्शनासाठी भाविकांनी व प्रवरा नदीला पूर आल्याने पर्यटकांनी श्री क्षेत्र देवगडला येऊन गर्दी करू नये, असे आवाहन श्री क्षेत्र देवगड दत्त देवस्थानतर्फे करण्यात आले. 

श्रीक्षेत्र देवगड (ता. नेवासे) देवस्थसनच्या प्रसिद्ध पत्रकात करोना संकटामुळे संपूर्ण भारतभर वेगळ्या उपाय योजना राबवित आहे. मठ, मंदिर, देवालये व ईतर धार्मिक स्थळे खुली करण्याबाबत शासनाने अद्यापपर्यंत कुठेलेही निर्देश जारी केलेले नाहीत.

शासनाने मंदिरे बंद ठेवण्याचे आदेशित केल्यामुळे श्रीदत्त मंदिर संस्थान श्रीक्षेत्र देवगड येथील श्रीभगवान दत्तात्रेय मंदिर, श्री समर्थ सद्गुरु किसनगिरीबाबा समाधी मंदिर, पंचमुखी श्री सिद्धेश्वर मंदिर व इतर मंदिरे परिसरातील प्रसादाची दुकाने पान-फुल, नारळ त्याचप्रमाणे यात्रीनिवास, यात्रिभुवन, भक्त निवास, भोजनालय, प्रसादालय पूर्णतः बंद आहेत. त्यामुळे कोणीही देवगडला येऊन गर्दी करू नये. मंदिर परिसर महाद्वारापासूनच पुर्णपणे बंद आहे. 

'पुरुषोत्तम' सप्ताहावर कोरोनाचे सावट 
तीन वर्षांनी येणारा पुरुषोत्तम मास सुरु झाला आहे. यानिमित्ताने देवगडला भव्य अखंड हरिनाम सप्ताहचे आयोजन होत असते. परंतु करोनामुळे हा अध्यात्मिक उपक्रम खंडित होवु नये म्हणून छोट्या पद्धतीने सुरू आहे. 

भाविक भक्तांनी देवगडला गर्दी करू नये. शासन, प्रशासन व देवस्थानला सहकार्य करत घरी रहावे सुरक्षित राहावे.

- गुरुवर्य भास्करगिरी महाराज, प्रमुख, श्री क्षेत्र देवगड संस्थान. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devotees, crowds of tourists to Shri Kshetra Devgad even during the Corona period