
नेवासे शहर : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउलींची कर्मभूमी व ग्रंथराज ज्ञानेश्वरी व अमृतानुभव या ग्रंथाचे रचनास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र नेवासे येथे कामिका वद्य एकादशी यात्रेनिमित्त माउलींचे मूर्तिमंत रूप असलेल्या ‘पैस’ खांबाचे दिवसभरात लाखो भाविकांनी दर्शन घेतले. यावेळी ‘पुंडलीक वरदे... हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानोबा-माउली तुकाराम’च्या जयघोषाने नेवासेनगरी दुमदुमली होती.