
-उद्धव देशमुख
बोधेगाव : कित्येक वर्षांपासून प्रलंबित पैठण-पंढरपूर रस्त्याचे भाग्य उजळणार, वारकऱ्यांची वाट सुखाची होणार अशा वल्गना गेल्या आठ वर्षांपूर्वी रस्त्याच्या कामास प्रारंभ झाल्यानंतर करण्यात आल्या. प्रत्यक्षात काही ठिकाणची कामेही करण्यात आली; परंतु अजूनही या पालखी मार्गाची कामे अर्धवट असल्याने यंदाही रस्त्याच्या भिजत्या घोंगड्यामुळे नाथांच्या पालखीला चिखलाच्याच पायघड्यावरून पुढे जावे लागणार आहे.