

Devotees Panic as Pooja Plate Burns at Shani Shingnapur
sakal
सोनई : शनिशिंगणापूर येथील शनिचौथऱ्यावर फक्त तेल नेण्यास परवानगी असताना महसूल विभागाच्या पुढाकारातून गावातील सर्व वाहनतळामध्ये १५१ ते ७०१ रुपये विक्रीच्या पूजासाहित्य ताटांचे फलक झळकले आहेत. व्यावसायिक गणित लक्षात घेऊन व्यावसायिकांनी सूचविलेल्या साहित्यांचा शिरकाव यानिमित्ताने ‘सर्वमान्य’ झाल्याने सर्वसामान्य भक्तांची कोंडी अधिकच वाढली आहे. प्रशासक तथा नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या आदेशानुसार फलकबाजी झाली असली, तरी सक्तीची कोंडी कायम असल्याचे चित्र आहे.