मंत्री धनंजय मुंडे यांनी शनिशिंगणापुरात केली ग्रहशांती!

Dhananjay Munde worshiped at Shanishinganapur
Dhananjay Munde worshiped at Shanishinganapur

सोनई (जि.अहमदनगर) : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पंधरा दिवसांपूर्वी राजकीय चिखलफेक झाली होती. रेणू शर्मा यांनी त्यांच्या आरोप केल्याने मंत्री मुंडे यांच्यावर हे गंडांतर आले होते. परंतु नंतर हे आरोप मागे घेतल्याने वातावरण निवळले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही त्यांची पाठराखण केली आहे.

ज मंत्री मुंडे यांनी आज शनिशिंगणापुरला भेट देवून शनिग्रह शांती व तेल अभिषेक करून स्वयंभू शनिमूर्तीचे दर्शन घेतले. 

वंजारवाडी (ता.नेवासे) येथील संत वामनभाऊ सप्ताह सोहळ्यातील पुरस्कार वितरण कार्यक्रमास जाताना त्यांनी शनिशिंगणापूरला भेट दिली. त्यांनी उदासी महाराज मठात अभिषेक करून दर्शन घेतले. 
पौरहित्य अशोक कुलकर्णी यांनी केले. यावेळी पद्मश्री डाॅ. तात्याराव लहाने व प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

देवस्थान ट्रस्टच्या जनसंपर्क कार्यालयात युवा नेते उदयन गडाख यांनी त्यांचा शाल, श्रीफळ व प्रसाद देवून सन्मान केला. या वेळी विश्वस्त समितीचे अध्यक्ष भागवत बानकर, उपाध्यक्ष विकास बानकर, चिटणीस अप्पासाहेब शेटे, माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र गुगळे उपस्थित होते. येथील दर्शनाने आत्मिक समाधान लाभले असुन मनाला उर्जा प्राप्त झाली आहे.असे मुंडे यांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com