esakal | घराची आग्नेय दिशा बिघडल्यास होतो हा आजार
sakal

बोलून बातमी शोधा

Importance of Southeast Direction in Architecture

या चक्रावर वात, पित्त, कफ यांचे संतुलन साधून आयुर्वेद माणसाला निरामय आरोग्यदायी जीवन प्रदान करते. 
या अग्नितत्त्वात बाधा असेल म्हणजेच दोष असेल तर

घराची आग्नेय दिशा बिघडल्यास होतो हा आजार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर ः आपल्या शरीरातल्या "मणिपूर' चक्राशी संबंधित असलेल्या या तत्त्वाचा विचारसुद्धा चेतना देणारा असाच आहे. 
या मणिपूर चक्राचा बीजमंत्र "ओम ऱ्ही' असा आहे. ऊर्जेचे शक्तीमध्ये रूपांतर करण्याचे प्रमुख काम या चक्राचे आहे. म्हणूनच वास्तुशास्त्रात उपदिशा महत्त्वाच्या आहेत. कारण दिशांमध्ये ऊर्जा, तर उपदिशेत त्या ऊर्जेचे बळ शक्तीस्वरूपात आहे. हे चक्र शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक शक्ती आपल्याला प्रदान करते. 

वास्तुशास्त्रातसुद्धा पूर्व आणि दक्षिण या दिशांमध्ये हे तत्त्व "आग्नेय दिशा' नावाने विराजमान झालेले आहे. वास्तुशास्त्रात या पूर्व आग्नेय प्रभागातल्या दोषांचे प्रतिबिंब आपण आज बदलत्या आर्किटेक्‍चरमध्ये पाहतो आणि बहुतांश ठिकाणी ते अनुभवतो. काळ जसा बदलतोय तशी कुंडल्यांची पण उलथापालथ होतीये. 
आपल्या वास्तूत अस्तित्वात असलेले लगेच लक्षात येतील असे दोष म्हणजे आग्नेय प्रभागात असलेले शौचालय, जिना किंवा लिफ्ट, पाण्याच्या जमिनी, खालच्या किंवा वरच्या टाक्‍या, आजकालच्या फ्लॅटमध्ये एक आपल्या डिझाईनचा भाग म्हणून सुळक्‍याच्या रूपाने केलेले एक्‍सटेंशन.

अंडरग्राऊंड पार्किंग हे छोटे-मोठे अनेक दोष आपल्या बेशिस्त जीवनशैलीला अधिकच चालना देत आहेत. या अग्नीतत्त्वातल्या दोषामुळे सगळ्या जगात धुमाकूळ घालणारा मधुमेह या बेशिस्त जीवनशैलीचाच भाग नाही का? कारण चयापचयाची क्रिया जेव्हा अग्नितत्त्व चालवते. त्यात बिघाड झाला तर असे "दीर्घकालीन' न सुटणारे आजार का नाही आपल्याभोवती फेर धरणार? लहानपणापासून सुरू होणारे डोळ्यांचे विकार, पोटाचे विकार, अतिआत्मविश्वासाने होणारे नुकसान आणि त्या नुकसानीत डिप्रेशनच्या स्वरूपात अडकणारा तरुण वर्ग किंवा ऐन महत्त्वाच्या वेळी काम आणि मुद्दे विसरणे किंवा विस्मरण, न्यूनगंड, आळस, दांभिकपणा, पिढ्यांमधले मतभेद, गृहकलह, व्यभिचार, पुरुष संतती, शिक्षण, करिअर आदी प्रश्न, हार्मोनल प्रश्न, कुटुंबातल्या एकमेकांबद्दलचा अनादर हे सर्व या बिघडलेल्या अग्नितत्त्वाचे परिणाम आपण अनुभवतो.

हेही वाचा - चीननेच बनवला कोरोना व्हायरस

ज्योतिषशास्त्रातसुद्धा मेष, सिंह, धनू या अग्नितत्त्वांच्या राशीत किंवा त्यांच्या नक्षत्रात असलेला दोष. कुंडलीतील लग्न, पंचम, नवम स्थानांचा दोष हा वास्तूत या पूर्व आग्नेय प्रभागातून म्हणजेच अग्नितत्त्वातून डोकावतोच. कारण कुंडली म्हणजे आपल्या जन्माच्या वेळी आकाशात असलेल्या ताऱ्यांचा नकाशा. तर त्याचे मूर्त स्वरूप म्हणजे आपली वास्तू. आपले शरीर या षट्‌चक्रांच्या कार्यावर चालते.

या चक्रावर वात, पित्त, कफ यांचे संतुलन साधून आयुर्वेद माणसाला निरामय आरोग्यदायी जीवन प्रदान करते. 
या अग्नितत्त्वात बाधा असेल म्हणजेच दोष असेल, तर नुसत्या वास्तूत उपचार करून चालत नाही. त्याला वैयक्तिक उपचारांची जोडही द्यावी लागते. योगशास्त्र, संगीतशास्त्र हे त्यासाठी तर आहेत. विविध प्राणायाम, चालणे, योगासने, सतत कामात राहणे, काही ठरावीक संगीत ऐकणे यांसारख्या उपायांची जोड दिली, तर एकूणच केलेल्या सर्व उपायांचा उपयोग हा दीर्घकालीन फलदायी होतो. संगीतशास्त्राचा विचार करता, यमन राग, श्री राग, हमीर राग, भूपराग, भैरवी राग, राग भीमपलासी, राग सारंग, खमाडा राग इ. वैद्यकीय इलाज वास्तुशास्त्रीय उपाय या त्रिसूत्रीच्या माध्यमातून आपण आपल्या शरीरावर ताबा ठेवणाऱ्या या "मणिपूर' चक्राचा "मणी' आपल्या हातात ठेवू शकतो. 

- डॉ. कौस्तुभ काळे 
अहमदनगर