esakal | ज्यांना निधी कसा येतो माहिती नाही, त्यांनी बोलूच नये; कोपरगावात बोरावके-कोल्हेंमध्ये जुंपली
sakal

बोलून बातमी शोधा

Dispute between Boravke-Kolhe in Kopargaon

कोपरगाव नगरपरिषदेला 14 व्या वित्त आयोगाचा निधी आमदार आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्यामुळेच मिळाला असून, एका सहकारी संस्थेचा अभ्यास ज्यांना अजून व्यवस्थित समजला नाही त्यांनी असे बोलणे हास्यास्पद असल्याचेही बोरावके यांनी म्हटले आहे. 

ज्यांना निधी कसा येतो माहिती नाही, त्यांनी बोलूच नये; कोपरगावात बोरावके-कोल्हेंमध्ये जुंपली

sakal_logo
By
सचिन सातपुते

कोपरगाव ः मतदारसंघाच्या विकासासाठी निधी आणण्यात लोकप्रतिनिधींची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, त्यांच्या पाठपुराव्यातूनच निधी मिळतो. मात्र, ज्यांना याची माहितीच नाही अशा व्यक्तींनी बोलू नये, असा उपरोधिक सल्ला राष्ट्रवादीचे गटनेते वीरेन बोरावके यांनी विवेक कोल्हे यांचे नाव न घेता दिला आहे.

कोपरगाव नगरपरिषदेला 14 व्या वित्त आयोगाचा निधी आमदार आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्यामुळेच मिळाला असून, एका सहकारी संस्थेचा अभ्यास ज्यांना अजून व्यवस्थित समजला नाही त्यांनी असे बोलणे हास्यास्पद असल्याचेही बोरावके यांनी म्हटले आहे. 

हेही वाचा - साठ वर्षांवरील व्यक्तींना आणायचे नाही मग पोरांना सांभाळील कोण

ते म्हणाले, की शहरातील विविध रस्त्यांसाठी आमदार काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निधीची मागणी केली होती. काही महिन्यांपासून कोरोनाच्या संकटामुळे विकासकामांसाठी निधी मिळण्यात अडचणी येत आहेत. कोपरगाव शहरासाठी मिळणाऱ्या निधीचा प्रस्ताव महिनाभरापासून जिल्हाधिकारी कार्यालयात पडून होता.

या बाबत जिल्हाधिकाऱ्यांना वारंवार भेटून रस्त्यांसाठी आमदार काळे यांच्या प्रयत्नातून सहा कोटींचा निधी प्राप्त झाला. यापूर्वी जिल्हा नियोजन मंडळातूनही विविध कामांसाठी दोन कोटी, नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या कामासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत दोन कोटींचा निधी आणला.

निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करणे ही त्यांची जबाबदारी ते समर्थपणे पार पाडत आहे. आमदार काळे व नगराध्यक्षांच्या समन्वयातून शहराची विकासकामे मार्गी लागत असल्याने तुमच्या पोटात पोटशूळ उठणार, हे साहजिकच आहे. मात्र, तुमच्या नगरसेवकांच्या प्रभागातील विकासकामांसाठीही आमदार काळे यांच्यामुळे निधी मिळाला याची आपणास माहिती नाही. त्यामुळे यापुढे सर्व गोष्टींची माहिती घेऊन व खातरजमा करूनच वक्तव्य करावे, असा सल्लाही बोरावके यांनी विवेक कोल्हे यांना दिला आहे. 

संपादन - अशोक निंबाळकर

loading image