esakal | पंकजांचा अभ्यास झाला, शिंदे सरांना जमेना... भाजपातील "दादा"गिरीला टोमणा
sakal

बोलून बातमी शोधा

Dispute in BJP over Legislative Council elections

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीतून पक्षातील इच्छुक, नेते काही शिकतील, असे विधान केले होते. यावरून वादंग सुरू झाले आहे.

पंकजांचा अभ्यास झाला, शिंदे सरांना जमेना... भाजपातील "दादा"गिरीला टोमणा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नगर ः विधान परिषदेच्या निवडणुकीवरून भारतीय जनता पक्षात उठलेले वादळ थांबण्याचे नाव घेत नाही. नाथाभाऊ तथा एकनाथ खडसे यांनी मी उमेदवारी केली असती तर भाजपची मते फुटली असती, असा गौप्यस्फोट करून खळबळ उडवून दिली. त्यांच्या या वक्तव्याची दखल पक्षश्रेष्ठींना घ्यावी लागली. कोणी सांगितले की ते संघाच्या नियमात बसले नाही तर कोणी शांत राहण्याचा सल्ला दिला.

विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी पक्षाने नाथाभाऊ, पंकजा मुंडे, प्रा. राम शिंदे आदी नेत्यांना उमेदवारी डावलली होती. तेव्हापासून पक्षांतर्गत वाद सुरू आहे.

सुरूवातीला विधानसभेला आणि नंतर विधान परिषदेला डावलल्याने एकनाथ खडसे यांनी थेट पक्षनेतृत्वावर निशाणा साधला आहे. पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी तर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यामुळेच ताईंचा पराभव झाला आणि आता ते डावलत आहेत. ही भाजप म्हणजे टरबुज्या भाजप आहे, असे आरोप केले होते. काही पदाधिकाऱ्यांनी तर थेट राजीनामेच दिले.

हेही वाचा - मुख्यमंत्री ठाकरे यांची नगरमध्ये गुंतवणूक

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीतून पक्षातील इच्छुक, नेते काही शिकतील, असे विधान केले होते. त्याला पंकजा मुंडे यांनी ट्विट करीत उत्तर दिले. त्यामुळे पुन्हा पक्षातील वाद उफाळला आहे.

त्या ट्विटमध्ये म्हणतात, स्वतःच स्वतःला शिकवते आहे. शून्यापासून सुरू केलं..चित्र चांगलं जमेल थोड्यात दिवसांत

अशा आशयाचे ते सूचक ट्विट आहे.

पक्षाच्या कोणत्याही वादात कधीच न पडणारे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. सर्वांची शिफारस असताना उमेदवारी डावलली गेली, अशी भावना माध्यमांकडे व्यक्त केली होती. परंतु आता त्यांनीही आपला नाराजीनामा उघडपणे बोलून दाखवायला सुरू केली आहे.

पंकजाताई मुंडे यांनी चांगला अभ्यास केला. (त्यामुळे रमेश कराड यांना उमेदवारी मिळाली) जो. मला आणि इतरांना जमला नाही.

पक्षाचे प्रामाणिक काम करूनही असे होत असेल तर काय करायचे, असा सवाल शिंदे यांचे कार्यकर्ते करीत आहेत.

loading image