esakal | मृत्यूनंतर स्मशानातही जागा मिळेना, पोलिसही आले अन्...

बोलून बातमी शोधा

Dispute over cemetery at Shrirampur

दफनविधीसाठी खड्डा खोदताना नजिकच्या शेतकऱ्याने त्यास विरोध केल्याने तालुका पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

मृत्यूनंतर स्मशानातही जागा मिळेना, पोलिसही आले अन्...
sakal_logo
By
गौरव साळुंके

श्रीरामपूर : तालुक्‍यातील भोकर येथील आदिवासी स्मशानभुमीची जागा पुन्हा एकदा वादात सापडली आहे. गावातील एका महिलेचे निधन झाल्याने स्मशानभूमीचा वाद पुन्हा ऐरणीवर आला. आहेर यांच्या निधनानंतर दफनविधी कुठे करायचा हा प्रश्‍न निर्माण झाला. त्या दिवशी सायंकाळी सहाच्या सुमारास अंत्यविधी सुरु झाला. 

दुसराच वाद वाढला

दफनविधीसाठी खड्डा खोदताना नजिकच्या शेतकऱ्याने त्यास विरोध केल्याने तालुका पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस व आदिवासी संघटनेच्या नेत्यांमध्ये चर्चेदरम्यान एका पोलिसाने कोरोना संसर्गामुळे नागरीकांची गर्दी पांगविण्यासाठी खाक्‍या दाखविल्याने दुसराच वाद वाढला. त्यामुळे संबंधीत पोलिस कर्मचाऱ्यावर कारवाई झाल्याशिवाय अंत्यविधी न करण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला होता.

जागेचा वाद मार्गी लागत नसल्याने संतप्त जमावाने ग्रामपंचायत कार्यालयासमोर दफनविधी करण्याचा निर्णय घेत खड्डा खांदला. तशी माहिती तहसीलदार पाटील यांना मिळाल्याने त्यांनी तातडीने घटनास्थळी जावुन मध्यस्थी केली. रात्री 11 च्या सुमारास 40 गट क्रमांकाच्या रस्त्या लगतच्या क्षेत्रात तणावपुर्ण वातावरणात दफनविधी झाला. 

अशोकचे संचालक पुंजाहरी शिंदे, भाजपाचे भाऊराव सुडके, तलाठी ज्ञानेश्‍वर हाडोळे, पोलिस पाटील बाबासाहेब साळवे, सरपंच दत्तात्रेय आहेर, उपसरपंच महेश पटारे, अनिल मोरे, भालेराव, सुभाष मोरे उपस्थित होते.