esakal | मुळा कारखान्याने सभासदांना केले चौदा कोटी रूपयांचे वाटप
sakal

बोलून बातमी शोधा

Distribution of Rs. 14 crore by Radish Factory

कारखान्याने वीजप्रकल्प उभारण्यासाठी गळीत हंगाम 2010-11 मध्ये गळितास आलेल्या उसाच्या पेमेंटमधून प्रतिटन पन्नास रुपयांप्रमाणे कपात केली होती.

मुळा कारखान्याने सभासदांना केले चौदा कोटी रूपयांचे वाटप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोनई : मुळा सहकारी साखर कारखान्याने सभासदांची परतीची ठेव, ठेवींवरील व्याज आणि कारखान्याच्या कामगारांना बोनस व पगाराची रक्कम मिळून चौदा कोटींचे वाटप दिवाळीपूर्वी केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर यांनी दिली. 

कारखान्याने वीजप्रकल्प उभारण्यासाठी गळीत हंगाम 2010-11 मध्ये गळितास आलेल्या उसाच्या पेमेंटमधून प्रतिटन पन्नास रुपयांप्रमाणे कपात केली होती. ठेवीची मुदत संपत असल्याने ती दिवाळी सणापूर्वी देण्याचा निर्णय कारखान्याने घेतला होता. तसेच, सभासदांच्या जमा ठेवींवरील व्याज दर वर्षी दिवाळीपूर्वी वाटप करण्यात येते.

या प्रमाणे मुदत संपलेल्या ठेवी व जमा ठेवींवरील व्याजाच्या रकमा संबंधित सभासदांच्या बॅंक खात्यांवर वर्ग करण्यात आल्या. कारखाना कामगारांची बोनस व पगाराची रक्कमही त्यांच्या खात्यांवर वर्ग केली असून, सभासद व कामगारांना परतीची ठेव, व्याज, पगार व बोनस मिळून चौदा कोटींचे वाटप केल्याचे तुवर यांनी सांगितले.