esakal | भगतसिंग दूधउत्पादक संस्थेकडून दीपावलीनिमित्त एक कोटीचे वाटप
sakal

बोलून बातमी शोधा

Distribution of Rs one crore on the occasion of Diwali from Bhagat Singh Milk Producers Association

कोल्हेवाडी येथील भगतसिंग सहकारी दूधउत्पादक संस्थेने दीपावलीनिमित्त एक कोटी रुपये वाटप केले.

भगतसिंग दूधउत्पादक संस्थेकडून दीपावलीनिमित्त एक कोटीचे वाटप

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर (अहमदनगर) : तालुक्‍यातील कोल्हेवाडी येथील भगतसिंग सहकारी दूधउत्पादक संस्थेने दीपावलीनिमित्त एक कोटी रुपये वाटप केले. कोरोनाचे संकट व अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अशा अडचणीच्या काळातही संस्थेने एक कोटी रुपये दूधउत्पादकांच्या बॅंक खात्यांवर जमा केले आहेत.

त्यामध्ये प्रतिलिटर दोन रुपयांप्रमाणे अनामत 33 लाख रुपये, रिबेट 3 रुपये प्रतिलिटरप्रमाणे 50 लाख रुपये व दूध पेमेंटपोटी 17 लाख रुपये यांचा समावेश असल्याची माहिती अध्यक्ष भास्कर दिघे यांनी दिली. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
संस्थेने बेरोजगार तरुणांना दूधव्यवसायाला प्रवृत्त करून, गायीच्या खरेदीसाठी बिनव्याजी दोन कोटींचे वाटप केले. दैनंदिन पाच हजार लिटर दूधसंकलन असलेल्या या संस्थेची स्वत:च्या मालकीची इमारत असून, चिलिंग प्लॅंट, पशुखाद्य विभाग आदी सुविधाही संस्थेतर्फे दिल्या जातात.

संस्थेचे भागभांडवल दोन लाख रुपये, तर निधी 55 लाख रुपये आहे. संस्थेकडून श्रीरामपूरच्या केशव प्रोसेसर्सला दूधपुरवठा केला जातो. संस्था प्रगतिपथावर नेण्यासाठी उपाध्यक्ष विश्वनाथ कोल्हे, व्यवस्थापक बजरंग वामन, संचालक मोहन वामन, बाबूराव दिघे, संपत अरगडे, रतन घोष, पोपट वाळुंज, गयाबाई दिघे, अशोक गुंजाळ, किसन दिघे, निवृत्ती काळे, भास्कर खुळे, जालिंदर वाकचौरे, आनंदा गुंजाळ, बाबासाहेब गुंजाळ, संपत कोल्हे आदींचा मोलाचा वाटा आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर

loading image
go to top