esakal | निघोजमध्ये आठ दिवस लॉकडाउन; जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus lockdown

निघोजमध्ये आठ दिवस लॉकडाउन; जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

पारनेर (जि. नगर) : राज्यभरात, तसेच जिल्ह्यातही कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असतानाच, पारनेर तालुक्यात मात्र वाढत आहे. सरकारी यंत्रणेबरोबरच तालुक्यातील जनतेत चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आज (ता. ९) जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी निघोज येथे भेट देऊन, कोणती दक्षता घ्यावी, याबाबतच्या सूचना केल्या. निघोजमध्ये आठ दिवसांसाठी लॉकडाउन जाहीर केले आहे. फक्त दवाखाने व त्यांना संलग्न असलेली औषधांची दुकानेच फक्त सुरू राहतील, असे तहसीलदार ज्योती देवरे यांनी जाहीर केले. (district collector instructions to lockdown for eight days in Nighoj)

तालुक्यातील पारनेरसह निघोज, पिंप्री जलसेन, पिंपळगाव रोठा, लोणी मावळा, पठारवाडी, जामगाव, वनकुटे, जवळा, कर्जुले हर्या व भाळवणी या ११ गावांत विशेष आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. त्याचबरोबर या गावांत कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले आहे. मात्र, निघोज येथे रुग्णसंख्या अधिक असल्याने, हे गाव आठ दिवसांसाठी लॉकडाउन केले आहे.

जिल्हाधिकारी डॉ. भोसले व प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी निघोज तसेच पिंप्री जलसेन येथे भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तालुक्यात रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात तालुका रुग्णसंख्येत अनेक दिवसांपासून पहिल्या क्रमांकावर आहे, ही बाब चिंतेची आहे. याबाबत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः याबाबत लक्ष घातले आहे. त्यांनी पारनेर तालुक्यात जनुकीय संक्रमण निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. भोसले व प्रांताधिकारी भोसले यांनी निघोज व पिंप्री जलसेन येथे भेट देऊन, एवढे रुग्ण अचानक वाढणे ही चिंतेची बाब आहे. त्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन केले. या दोन गावांत बाहेरील व्यक्तींना प्रवेश देऊ नये किंवा त्यांना विलगीकरण कक्षात ठेवावे, असेही सांगितले. तहसीलदार ज्योती देवरे, पोलिस निरीक्षक घनशाम बळप, अतुल भांबरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे उपस्थित होते.

(district collector instructions to lockdown for eight days in Nighoj)

हेही वाचा: नगर जिल्ह्यात १० वीज उपकेंद्रे उभारणार - ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे

loading image