जिल्हा रुग्णालय जळीतकांड : डॉ. शिंदेंसह तीन परिचारिकांना जामीन | Hospital Fire Case | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ahmednagar fire

जिल्हा रुग्णालय जळीतकांड : डॉ. शिंदेंसह तीन परिचारिकांना जामीन

अहमदनगर : जिल्हा शासकीय रुग्णालयातील जळीतकांड गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या डॉ. विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख आणि चन्ना आनंता या चौघींना जिल्हा सत्र न्यायाधीश एम. आर. नातू यांनी जामीन मंजूर केला आहे.

जिल्हा रुग्णालयात ता. 6 नोव्हेंबर रोजी लागलेल्या आगीत 12 रुग्णांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी चौघींना कर्तव्यात कसूर केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. आरोपींच्या वतीने ऍड. महेश तवले, ऍड. विक्रम शिंदे, ऍड. नीलेश देशमुख आणि ऍड. संजय दुशिंग यांनी युक्‍तीवाद केला.

दिल्ली येथील चित्रपट गृहास लागलेल्या आगीत सुमारे शंभर प्रेक्षकांचा मृत्यू झाला होता. कर्नल पुरोहित प्रकरण आदी महत्वाचे न्यायनिवाडे सादर केले होते. न्यायालयाने हे म्हणणे ग्राह्य धरले. डॉ. शिंदेंसह तीन परिचारिकांना जामीन मंजूर केला आहे. प्रत्येकी 25 हजार रुपयांची सॉलन्शी किंवा दोन जामीनदार, जिल्हा बाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. अत्यावश्‍यक कारणांसाठी जिल्ह्या बाहेर जायचे असल्यास न्यायालयाची परवानगी घ्यावी, साक्षीदारांवर दबाव आणू नये, या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या तपासी अधिकाऱ्यांना तपासात मदत करणे या चार अटी लादल्या आहेत.

हेही वाचा: नाशिक | ST संपामुळे सिटीलिंक मालामाल; रोजचा गल्ला 10 लाखांपुढे

loading image
go to top