
अहिल्यानगर : जिल्ह्यात आगामी तीन दिवस उष्णतेची लाट राहणार आहे. हवामान खात्याने जिल्ह्यासाठी यलो अलर्टचा इशारा दिला आहे. नागरिकांनी उष्मालाटेपासून बचाव होण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी केले आहे.