
अहिल्यानगर : कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना जलद व पारदर्शक पद्धतीने देणे सुलभ व्हावे, याकरिता केंद्र शासनाने ‘ॲग्रीस्टॅक’ योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात २ लाख १० हजार ३८५ शेतकऱ्यांनी ओळखपत्रासाठी नोंदणी केली आहे. ‘ॲग्रीस्टॅक’ योजनेत नोंदणी करण्यात जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे.