
श्रीरामपूर: सप्ताह संपतो, झेंडे उतरतात, गर्दी ओसरते... पण सप्ताहात उरलेल्या भाकरींची पोती मात्र सावरगाव (गोपाळवाडी, ता. येवला) येथील ठाकरे कुटुंबाच्या ओटीपोटात नवसंजीवनी घेऊन पोहोचतात. गंगागिरी महाराज सप्ताहात सात पिढ्यांपासून स्वच्छता आणि अनुशासनाची अखंड सेवा देणाऱ्या या कुटुंबाकडून ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने आणि कृतज्ञतेने जपली जाते. ते ना मानधन मागतात ना कौतुक. त्यांच्या हातात असतो फक्त एक बांबूचा दांडा, डोळ्यांत सेवा आणि मनात एक निचित धारणा ‘संतांची जागा पवित्र असली पाहिजे.’