
जिल्ह्यातील पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी घरकुल योजना यांचा आढावा घेतला. त्यात गतवर्षीची कामे अपूर्ण असून, यंदा मंजूर उद्दिष्टापैकी, निधी येऊनही पहिला हप्ता न दिल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
नगर: नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आज जिल्हा परिषद अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेत, कामकाजाची माहिती घेतली. अधिकाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले. मात्र, घरकुलांच्या मुद्द्यावरून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली.
जिल्हा परिषदेत आज सायंकाळी विभागीय आयुक्त गमे यांनी जिल्हा परिषदेच्या कामांचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर आदी उपस्थित होते.
हेही वाचा - पाथर्डीत बहरली गांजाची शेती
जिल्ह्यातील पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी घरकुल योजना यांचा आढावा घेतला. त्यात गतवर्षीची कामे अपूर्ण असून, यंदा मंजूर उद्दिष्टापैकी, निधी येऊनही पहिला हप्ता न दिल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
तसेच, जागेअभावी घरकुलांची कामे रखडणार नाहीत, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांना सूचना केल्या. त्यावर जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी शासकीय जागा, गायरान जागा घरकुलांसाठी तातडीने मंजूर करण्याचे आश्वासन दिले. जेथे 50 हजारांत घरकुलासाठी जागा मिळणार नाही, तेथे काही लाभार्थींना एकत्र करून घरकुल उभारण्याची सूचना आयुक्त गमे यांनी केली.
ग्रामपंचायत पातळीवर होणाऱ्या अपहाराची रक्कम भरून घेण्यासोबत ग्रामपंचायतींना देण्यात येणाऱ्या कर्जाच्या नियमित वसुलीवर भर देण्यास गमे यांनी सांगितले.