

Ahilyanagar Traffic Jam After Diwali Holiday 105 Extra ST Buses Deployed as Pune Mumbai Routes Face Heavy Rush
sakal
अहिल्यानगर: दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर गावी आलेल्या प्रवाशांचा परतीचा प्रवास सुरू झाला असतानाच सर्वच महामार्गांवर वाहनांची मोठी गर्दी झाली आहे. महामार्गांवरील चौक आणि गावांमधील वाहतूक कोंडीमुळे प्रवासासाठी दोन ते तीन तास अधिक लागत आहेत. परिणामी, एसटी बसच्या नियोजित फेऱ्यांवर परिणाम झाला असून, बसच्या फेऱ्यांचे नियोजन कोलमडले आहे. त्यामुळे प्रवाशांच्याही वेळेचेही नियोजन पुरते कोलमडले आहे.