esakal | मनपा कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड Municipal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagar

मनपा कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अहमदनगर : अहमदनगर (Nagar) महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त (Diwali) बोनस, सानुग्रह अनुदान, थकीत देणे दिवाळीपूर्वी मिळणार आहे. सानुग्रह अनुदानापोटी साडेआठ हजार रुपये देण्यात येणार आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

दिवाळीपूर्वीच ही रक्कम मिळावी, अशी मागणी कामगार संघटनेने केली होती. याबाबत महापौर रोहिणी शेंडगे यांनी महापौर कार्यालयामध्ये बैठक घेतली. या वेळी स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, महिला बालकल्याण समितीच्या सभापती पुष्पा बोरुडे, नगरसेवक श्याम नळकांडे, माजी विरोधी पक्षनेते संजय शेंडगे, अतिरिक्‍त आयुक्‍त प्रदीप पठारे, कामगार संघटनेचे अध्यक्ष अनंत लोखंडे, सरचिटणीस आनंद वायकर, तसेच पदाधिकारी उपस्थित होते.

महापौर म्हणाल्या, की गेल्या दीड वर्षापासून कोरोना प्रादुर्भावामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. कोरोनाच्या संकटातदेखील कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले आहे. कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड व्हावी, यादृष्टीने मनपा कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान म्हणून साडेआठ हजार रुपये व सहाव्या वेतन आयोगातील फरकापोटी एक हप्ता देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. सर्व रक्‍कम कर्मचाऱ्यांना दिवाळी सणाच्या १५ दिवस आधी देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याबाबत प्रशासनाला आदेश दिले आहेत.

हेही वाचा: टॅगिंगद्वारे शासकीय थकबाकी वसूल करण्याचे बँकांना आदेश

कामगार संघटनेचे अध्यक्ष लोखंडे म्हणाले, की आमची मागणी कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानाची रक्कम दिवाळीपूर्वी देण्याबाबत होती. तसेच, थकीत देणेदेखील देण्याबाबतची मागणी केली होती. कर्मचाऱ्यांसाठी सानुग्रह अनुदान व सहाव्या वेतन आयोगाचा एक हप्ता देण्याचे मान्य केल्याने, हा निर्णय कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने चांगला आहे. दिवाळीपूर्वीच ही रक्कम मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांना आधार होणार आहे.

loading image
go to top