esakal | कर्जतमधील प्रभातनगरात कोविड सेंटर उभारणीस स्थानिकांचा विरोध

बोलून बातमी शोधा

कोविड सेंटर
कर्जतमधील प्रभातनगरात कोविड सेंटरला स्थानिकांचाच विरोध
sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

कर्जत : शहरातील प्रभातनगर परिसरात कोविड सेंटर सुरू करण्यास रहिवाशांनी विरोध केला आहे. त्याबाबतचे निवेदन मुख्याधिकाऱ्यांना दिले असून, मागणीची दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

तालुक्‍यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत आहेत. त्यामुळे प्रशासनाने कर्जत शहरातील प्रभातनगर येथे कोविड सेंटर सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्याची माहिती मिळताच परिसरातील रहिवाशांनी बैठक घेतली. तसेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत येथील चार जण दगावले आहेत. या घटनेने रहिवासी भयभीत झाले आहेत. त्यामुळे येथे कोविड सेंटर सुरू करू नये, या मागणीचे निवेदन आमदार रोहित पवार, प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार नानासाहेब आगळे, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांना निवेदन दिली. त्यावर रहिवासी भागात कोविड सेंटर सुरू केले जाणार नाही, अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली.

निवेदनावर उत्तम खराडे, प्राचार्य सूर्यभान सुद्रिक, भाऊसाहेब शेळके, दादासाहेब थोरात, शरद म्हेत्रे, धनाजी निकम, संपत चौधरी, सुनील भोसले, प्रमोद शिंदे, प्रसाद कानगुडे, बाबूश्‍याम पवार आदींच्या सह्या आहेत.

बातमीदार - नीलेश दिवटे