
संगमनेर : सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या डॉक्टरला सोमवारी (ता.७) दुपारी न्यायालयात हजर केले असता, १० दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. शहरातील कर्पे रुग्णालयात उपचार घेणाऱ्या बारावीतील सोळावर्षीय विद्यार्थिनीवर डॉ. अमोल कर्पे याने धमकी देत अत्याचार केल्याची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली.