esakal | डॉक्टरच म्हणताहेत आम्हासोबत डॉक्टर द्या, साईसंस्थानचे डॉक्टर वैतागले
sakal

बोलून बातमी शोधा

The doctors of Sai Sansthan were annoyed

साईसंस्थानचे 32 डॉक्‍टर व त्यांच्यासमवेत काम करणाऱ्या सुमारे 40 मदतनिसांनी गेल्या तीन महिन्यांपासून या दोन्ही केंद्रांची जबाबदारी चांगली सांभाळली. साईसंस्थानाकडून रुग्णांना वेळेवर जेवण, चहा-नाष्टा दिला जातो.

डॉक्टरच म्हणताहेत आम्हासोबत डॉक्टर द्या, साईसंस्थानचे डॉक्टर वैतागले

sakal_logo
By
सतीश वैजापूरकर

शिर्डी ः सलग तीन महिने कोविड केअर सेंटरमध्ये सेवा करून आम्ही "हाय रिस्क'मध्ये जाण्याची वेळ आली. डॉक्‍टर असलो, तरी आम्ही शेवटी माणसेच आहोत. आता तरी आमच्या मदतीला तालुक्‍यातील सरकारी सेवेतील 12 एमबीएस डॉक्‍टर धाडावेत.

गेली तीन महिने दोन्ही केंद्रात रुग्णांवर उत्तम उपचार होतात. मात्र, सर्व जबाबदारी आमच्या खांद्यावर टाकू नका, अशी मागणी साईसंस्थानच्या सेवेतील 32 एमबीबीएस डॉक्‍टरांनी केली आहे. अतिरिक्त ताणाबाबत हे डॉक्‍टर उद्या (बुधवारी) तहसीलदारांना निवेदन देणार आहेत.

तालुक्‍यात सरकारी सेवेत असलेल्या 12 एमबीबीएस डॉक्‍टरांना या केंद्रात सेवेसाठी आणावे, अशी मागणी करणार आहेत. 
गेल्या तीन महिन्यांत सरकारी सेवेतील एमबीबीएस डॉक्‍टरांपैकी कुणालाही कोविड उपचारकेंद्रात सेवेसाठी धाडले नाही.

साईसंस्थानाचे 32 डॉक्‍टर तीन महिन्यांपासून या केंद्रात कार्यरत आहेत. साईसंस्थानने तीन महिन्यांपूर्वी येथे दोन कोविड सेंटर सुरू केले. सर्व भार साईसंस्थानच्या यंत्रणेवर टाकून सरकारी अधिकारी मोकळे झाले.

तीन महिने लोटले, तरी येथील डॉक्‍टरांकडे पाहायला कुठलाही अधिकारी तयार नाही. उलट शेजारच्या अन्य तालुक्‍यांत हे काम सरकारी सेवेतील डॉक्‍टर मंडळी व खासगी सेवा करणारी डॉक्‍टर मिळून करीत आहेत. हा आमच्यावर अन्याय आहे. आम्हीही माणसे आहोत. आमच्याकडे कुणीही लक्ष देत नाही, अशी भावना डॉक्‍टरांत निर्माण झाली आहे. 

साईसंस्थानचे 32 डॉक्‍टर व त्यांच्यासमवेत काम करणाऱ्या सुमारे 40 मदतनिसांनी गेल्या तीन महिन्यांपासून या दोन्ही केंद्रांची जबाबदारी चांगली सांभाळली. साईसंस्थानाकडून रुग्णांना वेळेवर जेवण, चहा-नाष्टा दिला जातो.

हेही वाचा - फक्त माझ्यावरच नाही, आरोग्यमंत्र्यांवर गुन्हे दाखल करा

आजवर तीनशेहून अधिक रुग्ण येथून बरे होऊन गेले. या काळात केवळ पाच-सहा रुग्णांना तातडीच्या उपचारासाठी बाहेर पाठविण्याची वेळ आली. मात्र, या डॉक्‍टरांना सरकारी डॉक्‍टरांची साथ मिळाली नाही. त्यांच्यासमोर आता "हाय रिस्क'मध्ये जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या डॉक्‍टरांनी तहसीलदारांनी निवेदन देऊन या धोक्‍याकडे लक्ष वेधण्याचे ठरविले आहे.

तालुक्‍यात सरकारी सेवेतील 12 एमबीबीएस डॉक्‍टर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि साईसंस्थानचे डॉक्‍टर कोविड सेंटरमध्ये, अशी स्थिती आहे. अहमदनगर

संपादन - अशोक निंबाळकर

loading image
go to top