
संगमनेर : घरासमोरील परिसरात शेळ्या चारत असलेल्या तरुणावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झेप घेत गंभीर जखमी केल्याची घटना अकलापूर (ता. संगमनेर) येथे सोमवारी( ता.२६) दुपारी घडली. मात्र, जवळ असलेल्या पाळीव श्वानाच्या भुंकण्यामुळे गोविंदा नवनाथ दुधवडे (वय १९) या तरुणाचा जीव वाचला.