कोरोनाग्रस्त कुरणची कुत्री सोडली अकोल्यात; नागरिकांनी पाहिल्यावर झाले भलतेच...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 July 2020

संगमनेरमधील मोकाट कुत्री टेम्पोत भरुन अकोले तालुक्यातील रेडे रस्त्यावर सोडण्यात आली आहेत. हा प्रकार नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर सबंधीत टेम्पो आडवण्यात आला. दरम्यान अकोले पोलिस ठाण्यात मोकाट कुत्रे सोडल्याप्रकरणी कोणता गुन्हा दाखल करायचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

अकोले (अहमदनगर) : संगमनेरमधील मोकाट कुत्री टेम्पोत भरुन अकोले तालुक्यातील रेडे रस्त्यावर सोडण्यात आली आहेत. हा प्रकार नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर सबंधीत टेम्पो आडवण्यात आला. दरम्यान अकोले पोलिस ठाण्यात मोकाट कुत्रे सोडल्याप्रकरणी कोणता गुन्हा दाखल करायचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 
नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
तालुक्यातील कळस, कुंभेफळ येथे रस्त्यावर ठिकठिकाणी हे कुत्रे सोडण्यात आली. काही ग्रामस्थांच्या हा प्रकार लक्षात येताच गावातील व शेजारच्या नागरिकांनी फोन करून सदर गाडी रेडे येथे पकडली. संबधीत चालकास विचारना केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देत असल्याने संतप्त तरुणांनी त्या चालकास चोप दिला. चालक कुरण रोड (संगमनेर) येथील असून त्याचे नाव अल्ताप शेख (वय 43) आहे. पोलिस हेडकाँस्टेंबल संदीप पांडे यांनी सांगितले. कुत्रे हे संगमनेर नगरपालिका हद्दीत पकडलेली आहेत. संगमनेर नगरपालिकेचे कुत्रे पकडन्याचे काँट्रॅकट ज्या ठेकेदाराने घेतला आहे. त्या ठेकेदाराने ही कुत्री मूथाळणे- समशेरपूरच्या घाटात सोडण्यास सांगितले होते. मात्र संबंधित चालकाचे अंतर व त्रास वाचावा म्हणून त्याने संगमनेरहुन निघाल्यावर कळसमार्गे कुंभेफळहुन अकोलेकडे येत असतांना कळस येथे काही पाठीमागून लावलेले फाळेवर करून काही कुत्रे सोडून दिले. पुढे आल्यावर कुंभेफळजवळ असणाऱ्या ओढयाजवळ काही कुत्रे सोडले. तेथे ग्रामस्थांच्या हा प्रकार लक्षात आला. सुगाव- रेडेतील काही जणांना फोन करून सदर टेम्पो थांबविन्यास सांगितला. रेडे येथे कार्यकर्त्यांनी  टेम्पो येत असल्याचे पाहून गाडी रस्त्यावर आडवी लावली. त्यामुळे चालकाने टेम्पो थांबविला. तोपर्यंत कुंभेफळ, कळस येथील काही ग्रामस्थ तेथे पोहचले.  रेडे, कुंभेफळ व कळसचे अनुक्रमे पोलिस पाटील माणिक पांडे, रामदास कोटकर व संतोष वाकचौरे तसेच कुंभेफळचे माजी सरपंच रोहिदास कोटकर, नवनाथ पांडे, दगडू कोटकर, कळसचे कार्यकर्ते मच्छींद्र वाकचौरे यांनी टेम्पो अकोले पोलिस ठाण्यात आणला. त्यावेळी टेम्पोत फक्त नऊ कुत्रे शिल्लक होते.
कुरणला करोनाने कहर केला आहे. सदर टेम्पो हा कुरणचा असल्याचे समजते. तर चालक संगमनेर कुरण रोड येथील असल्याने कळस, कुंभेफळ, सुगाव, रेडे परिसरातील लोकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. संबंधितांवर गुन्हा दाखल करून तपस हेड कॉन्स्टेबल पांडे करीत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The dog was released in Akola taluka of Sangamner municipality