

Shiv Sena Won’t Tolerate Dadagiri: Gulabrao Patil’s Sharp Message
sakal
अहिल्यानगर: नगरमध्ये दडपशाही आणि दहशतीचे प्रकार सुरू आहेत. परंतु आम्हाला दाबू नका, आम्ही चेंडूसारखे आहोत. दादागिरीची भाषा आम्हाला शिकवू नका, अशा शब्दात शिवसेना नेते तथा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी-भाजप युतीवर निशाणा साधला. नगरमध्ये राष्ट्रवादी- भाजपची युती असली तरी इतर ठिकाणी मात्र अजित पवार यांना त्रास देण्याचे काम भाजपकडून सुरू आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. शहर विकासासाठी नगरविकास खात्याची आवश्यकता आहे आणि ते खाते एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे, त्यामुळे शिवसेनेला साथ द्या, असे आवाहन पाटील यांनी नगरकरांना केले.