
अहिल्यानगर : राज्य शासनाकडून महापालिकेला १५ व्या वित्त आयोगाद्वारे प्राप्त निधीत अपहार केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातून आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना वगळण्याचा अहवाल पोलिसांनी न्यायालयाला सादर केला होता. मात्र, अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी प्रतिभा पाटील यांनी पोलिसांचा हा अहवाल फेटाळला आहे. डॉ. बोरगे यांच्याविरुद्ध प्रथमदर्शनी पुरावे असल्याने या गुन्ह्यात आरोपी करण्याचा आदेश दिला आहे, तसेच डॉ. बोरगे यांना २७ जून रोजी होणाऱ्या सुनावणीला हजर राहण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे.