पारनेर - शिवाजी महाराजांच्या काळात तसेच पेशवाईमध्येही महाराष्ट्रात पुरातन काळापासून भाऊबंदकी सुरू आहे. मात्र या ठिकाणी आज एका चुलत भावाने आपल्या भावाच्या जीवनावर पुस्तक लिहीले आहे. ही साधी गोष्ट नाही. प्रत्येक कुटुंबात असे भाऊ जन्माला आले तर महाराष्ट्रातील भाऊबंदकी नष्ट होईल, असे प्रतिपादन अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.