
-नायक दरंदले
सोनई : पंढरपूरची आषाढी वारी आली की, महाराष्ट्रातील वारकरी आहे, तो उद्योग व शेतातील काम सोडून पायी दिंडीत सहभागी होतो. ''पाऊली चलती पंढरीची वाट'' हाच ध्यास घेऊन गुजरात राज्यातील मुळ रहिवासी व लंडन देशातील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत पीएचडी घेतलेल्या शास्त्रज्ञ पती, पत्नीने पाच हजार किलोमीटर पायी प्रवास करीत चारधाम यात्रा व देशातील प्रमुख धार्मिक स्थळांना भेटी दिल्या आहेत. पत्नीच्या निधनाने हतबल न होता शास्त्रज्ञ डॉ. देव उपाध्याय (वय ७४) यांनी यात्रेतील नाशिक ते शनिशिंगणापूर हा शेवटचा टप्पा प्रजासत्ताक दिनी पूर्ण केला आहे.