
शेवगाव : आफ्रिका खंडातील समुद्र सपाटीपासून १९३३५ फूट उंचीवर असलेला सर्वोच्च पर्वत किलीमांजारो येथे खडतर ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण करून शेवगाव येथील डॉ. मनीषा लढ्ढा यांनी प्रजासत्ताक दिनी तिरंगा ध्वज फडकाविला आहे. शेवगाव व महाराष्ट्रासाठी ही अभिमानास्पद घटना आहे. त्या रविवार भारतात परतल्या आहेत.