डॉ. सुजय विखे पाटलांनी दिली ७२ तासांचीच मुदत! म्हणाले, नंतर बघा काय करतो ते

विलास कुलकर्णी
Saturday, 2 January 2021

आज डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ व कामगारांसमोर खासदार डॉ. विखे पाटील बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष नामदेवराव ढोकणे, माजी अध्यक्ष उदयसिंह पाटील, उपाध्यक्ष दत्तात्रेय ढूस व संचालक उपस्थित होते. 

राहुरी : "तनपुरे साखर कारखान्याच्या बॉयलरमध्ये साखर जाणे हलगर्जीपणा आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून, कारखाना वारंवार बंद पडत आहे. नैसर्गिक दोष मान्य होता; परंतु कुणाला तरी कारखाना चालू नये असे वाटते. यापुढे 72 तासांचा अल्टीमेटम आहे. कारखाना सुरळीत सुरू झाला नाही, तर पत्रकार परिषद घेऊन, माझ्यासह संचालक मंडळ कारखान्याचा राजीनामा देईन, असा इशारा तनपुरे कारखान्याचे मार्गदर्शक खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिला. 

आज डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ व कामगारांसमोर खासदार डॉ. विखे पाटील बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष नामदेवराव ढोकणे, माजी अध्यक्ष उदयसिंह पाटील, उपाध्यक्ष दत्तात्रेय ढूस व संचालक उपस्थित होते. 

हेही वाचा - श्रीगोंदा बाजार समिती संचालकाच्या मुलाची आत्महत्या

खासदार डॉ. विखे पाटील म्हणाले, "मागील चार वर्षापासून कारखान्याच्या संचालक मंडळ व कामगारांनी कारखाना सुरळीत चालावा. यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. चालू गळीत हंगामात मागील दोन महिन्यापासून शेतकऱ्यांच्या उसाचे गाळप वेळेत होण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले जात आहेत. परंतु, विविध समस्या, अडथळे येत आहेत.

कारखाना सुरळीत चालण्यासाठी आठ- दहा कोटी रुपये खर्च केले. कारखाना वारंवार बंद पडण्यामागे नैसर्गिक दोष किंवा आपत्ती असती. तर मान्य केले असते. परंतु, बॉयलरमध्ये साखर दिसून आली. त्यामुळे मन सुन्न झाले." 

"कारखाना सुरळीत चालावा. असे आमचे प्रामाणिक प्रयत्न आहेत. परंतु, बॉयलरमध्ये साखर जाण्याचा प्रकार मानव निर्मित हलगर्जीपणा आहे. कारखाना सुरळीत चालावा. अशी काहींची मानसिकता नसल्याचे दिसते. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये. यासाठी येत्या 72 तासांची मुदत देतो.

नैसर्गिक आपत्ती वगळता कारखाना सुरळीत चालला नाही. तर, पत्रकार परिषद घेऊन, माझ्यासह संचालक मंडळ कारखान्याचा राजीनामा देईन." असे खासदार डॉ. विखे पाटील यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Sujay Vikhe Patil gave only 72 hours to the workers