श्रीगोंदे बाजार समिती संचालक नलगेंच्या मुलाची दौंडमध्ये गोळी झाडून आत्महत्या 

संजय आ. काटे
Saturday, 2 January 2021

माजी मंत्री व विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांचे सहकारी असणारे लक्ष्मण नलगे यांना सुधीर व दादा ही दोन मुले आहेत.

श्रीगोंदे : श्रीगोंदे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मण नलगे यांचे चिरंजीव व युवा व्यवसायीक दादा लक्ष्मण नलगे (वय 36) यांनी रिव्हॉल्व्हरमधुन स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.

आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास दौंड येथील राहत्या घरी ही घटना घडली. आत्महत्या मागचे कारण मात्र समजू शकले नाही. त्याच्यामागे आई, वडील, पत्नी, एक मुलगा, भाऊ असा परिवार आहे.

हेही वाचा - कांदा लागवडीचा नाद सुटेना 

दौंड पोलिसांत नलगे यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या खबरीनुसार मयत दादा नलगे हे दोन महिन्यांपासून पाठिच्या मणक्‍याच्या आजाराने त्रस्त होते. कदाचित त्यातून ही आत्महत्या केली असल्याची शक्‍यता आहे.

माजी मंत्री व विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांचे सहकारी असणारे लक्ष्मण नलगे यांना सुधीर व दादा ही दोन मुले आहेत. त्यापैकी दादासाहेब हा दौंड येथील दौंड येथील व्यवहार पाहत होते, त्यांच्याकडे परवानाधारक रिव्हॉल्व्हर होता. दादा याने दिवसांपूर्वी लग्नाचा वाढदिवस साजरा केला. सोशल मिडियावर फोटो टाकले. त्यानंतर ही दुर्दैवी घटना घडली. अहमदनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suicide of the son of Shrigonde Bazar Samiti Director Nalge