

Dr. Sujay Vikhe Patil Assures Faster Completion of Ahmednagar–Savali Vihir Highway Project
sakal
शिर्डी: केंद्र सरकारने जाहीर केलेली निविदा चाळीस टक्के कमी दराने भरून काम करणारा ठेकेदार अहिल्यानगर ते सावळीविहीर महामार्गाच्या नशिबी आला. ठेकेदाराच्या कामात दोष आहेत आणि अडचणी देखील आहेत. पुढील सहा महिन्यांत सावळीविहीर ते अहिल्यानगरपर्यंतचे काम पूर्ण होईल. दहा वर्षांपासून लोक हैराण आहेत. आता हे काम एकदाचे पूर्ण होऊ द्या. आपण लवकरच नव्याने या महामार्गाच्या काँक्रिटीकरणाच्या कामास मंजुरी आणू, असे आश्वासन आज भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डाॅ. सुजय विखे पाटील यांनी सावळीविहीर आणि परिसरातील ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांना दिले.