
कोल्हार : गुंडगिरी करणाऱ्यांनो डोक्यावर बसण्याचा प्रयत्न करू नका, तुमचा कायमचा बीमोड करू, त्यासाठी पोलिसांची मदत घेऊ, प्रसंगी कायदा हातात घेण्यासही मागेपुढे पाहणार नाही, कोणाच्याही झेंड्याच्या आड लपून गुंडगिरी, दादागिरी खपवून घेणार नाही, नको त्या प्रवृत्तींचा आधार घेत कुरघोड्यांचे राजकारण करण्यात आपण महिलांची सुरक्षितता व पिढीचे भवितव्य घडविण्याचे आपण विसरलो, अशी खंत व्यक्त करतानाच कोल्हार भगवतीपूरवासीयांनो पक्षभेद, जातीभेद व धर्मभेद विसरा. महिलांची सुरक्षा व गावपण टिकविण्यासाठी सज्ज व्हा. विखे पाटील कुटुंबीय तुमच्या पाठीशी राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.