डॉ. विखे पाटील कर्जतच्या गाळेधारकांना म्हणाले, नो टेन्शन मी आहे ना

नीलेश दिवटे
Monday, 31 August 2020

गाळेधारकांच्या डोक्यावरची टांगती तलवार कायमची दूर होईल. यासाठी कर्जत येथील गाळेधारकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी डॉ विखे पाटील यांनी तेथील व्यवसायकाना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या व त्या सोडवणुकीसाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले. 

कर्जत : शहराचा विकास आणि गाळेधारकांचे हित यांचा समन्वय साधून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी गाळेधारकांना दिले.

शहरातील मुख्य रस्त्यावरील व्यावसायिक व गाळेधारकांशी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी रविवारी संवाद साधला . या वेळी ते बोलत होते. सहाय्यक अभियंता अमित निमकर,मुख्य अधिकारी गोविंद जाधव,जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ,उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, स्वप्नील देसाई,सचिन पोटरे,दादासाहेब सोनमाळी, अशोक खेडकर, संघटनेचे अध्यक्ष गणेश जेवरे,अनिल गदादे,श्रीकांत तोरडमल, विनोद दळवी व गाळेधारक उपस्थित होते.

ते म्हणाले, शहराचा विकास करीत असताना तेथील व्यावसायिक हितसुद्धा जपले जाईल याची खबरदारी सुद्धा प्रशासनाने घेतली पाहिजे. याची दक्षता घेऊ या प्रश्नी सर्व लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. मी आहे ना तुम्ही चिंता करू नका. 

हेही वाचा - याला म्हणतात आमदार, काय दत्तक घेतलं बघा

कर्जत शहरातील मुख्य रस्त्यावरील दुतर्फा असणार्‍या गाळेधारकांना रस्ता रुंदीकरण मध्ये विस्थापित होण्याची वेळ आली आहे. गेल्या पन्नास वर्षांपासून येथे व्यवसाय करणाऱ्या, उदरनिर्वाह करणार्‍या लोकांच्या रोजीरोटी जाऊ नये, यासाठी बाह्यवळण रस्त्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाला पर्यायी बाह्यवळण रस्त्याचे सर्वेक्षण व आखणी करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार रस्त्याचे सर्वेक्षण सुरू होईल.

गाळेधारकांच्या डोक्यावरची टांगती तलवार कायमची दूर होईल. यासाठी कर्जत येथील गाळेधारकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी डॉ विखे पाटील यांनी तेथील व्यवसायकाना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या व त्या सोडवणुकीसाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Vikhe Patil told the shopkeepers of Karjat no tension