याला म्हणतात आमदार, त्यांनी काय दत्तक घेतलं बघा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 31 August 2020

आमदार संग्राम जगताप मितभाषी स्वभावामुळे त्यांनी अल्पावधीतच लोकसंग्रह केला. त्यांचा कामाची स्टाईल एकदम हटके आहे.

नगर ः आमदार संग्राम जगताप यांची नगर शहरात मोठी क्रेझ आहे. ते तरूणांच्या गळ्यातील ताईत आहेत. मितभाषी स्वभावामुळे त्यांनी अल्पावधीतच लोकसंग्रह केला. त्यांचा कामाची स्टाईल एकदम हटके आहे.

 जिल्हा वाहतूक शाखेने गेल्या आठ महिन्यांत दुचाकी व चारचाकी वाहनांवर कारवाई करून सुमारे दीड कोटींचा महसूल जमा केल्याचे वृत्त "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाले. या निधीतून महापालिकेला सिग्नल जीर्णोद्धार निधी देण्याची मागणी जागरुक मंचाने केली.

त्याचेही वृत्त प्रसिद्ध झाले. अखेर या वृत्ताची दखल घेत, आमदार संग्राम जगताप यांनी शहरातील आठ सिग्नल दत्तक घेतले आहेत. तसे पत्र जागरुक मंचाला दिले आहे. 

शहरात वर्षांनुवर्षे बंद असलेले सिग्नल सुरू करण्याची मागणी जागरुक नागरिक मंचाने गृहमंत्रालयाकडे केली होती. निवेदनात म्हटले होते, की जिल्हा वाहतूक शाखेने अवघ्या आठ महिन्यांत सुमारे दीड कोटींचा दंड वसूल करून विक्रम नोंदविला.

हेही वाचा - चहाचा शेवटचा घोट घेत असतानाच

या महसुलातून कमीत कमी 25 लाख रुपये दारिद्रयरेषेखालील नगरच्या महापालिकेला शहरातील सिग्नल सुरू करण्यासाठी दान म्हणून द्यावेत, अशी मागणी केली. तसे वृत्त "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाले. त्याची व जागरुक नागरिक मंचाच्या मागणीची दखल घेत, आमदार जगताप यांनी शहरातील आठ सिग्नल दत्तक घेतले आहेत. 

कायनेटिक चौक ते प्रेमदान चौक दरम्यानच्या राज्य महामार्गावरील आठ सिग्नलची देखभाल-दुरुस्ती जगताप स्वखर्चातून करणार असल्याचे जाहीर केले आहे. तसे पत्र जागरुक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहास मुळे यांना देण्यात आले आहे. 

नगरकरांना नियमांची ऍलर्जी असून, सर्व सिग्नल सुरू झाल्यानंतर त्यांना थोडीफार शिस्त लागेपर्यंत वाहतूक शाखेने प्रत्येक ठिकाणी वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याची नेमणूक करणे गरजेचे आहे. 
- सुहास मुळे, अध्यक्ष, जागरुक नागरिक मंच , अहमदनगर.

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Sangram Jagtap adopted the signal