Ahilyanagar Crime: 'नेवाशात दोन गावठी पिस्तुले जप्त'; सिनेस्टाईल पाठलाग करून दोन सराईत आरोपी जेरबंद
Dramatic Police Chase in Newasa: गावठी पिस्तुलांबाबत विचारपूस केली असता, ते मध्यप्रदेश येथून आजच खरेदी करून आणल्याचे त्यांनी सांगितले. आरोपींकडून २० हजार रुपये किमतीच्या गावठी पिस्तुलांसह एक मोटारसायकल, दोन मोबाईल, असा एकूण ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Two accused nabbed with country-made pistols in Newasa after high-voltage police chase.Sakal
नेवासे शहर : सिनेस्टाईल पाठलाग करून मंगळवारी पहाटे तालुक्यातील नांदूर शिकारी भागात दोन सराईत गुन्हेगारांना गावठी पिस्तुलांसह नेवासे पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिस कॉन्स्टेबल वाल्मीक वाघ यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.