"कुकडी' आवर्तनाबाबत "सस्पेन्स'; पिण्यासाठी की शेतीसाठी?

For drinking or farming Suspense about kukadi rotation
For drinking or farming Suspense about kukadi rotation
Updated on

श्रीगोंदे : कुकडी प्रकल्पातून येत्या शनिवारपासून (ता.6) आवर्तन सुटणार आहे. मात्र, हे पाणी शेतीला की पिण्यासाठी, याबाबत निश्‍चित माहिती मिळत नाही. नगर, पुणे किंवा सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनीही पिण्यासाठी पाण्याची मागणी केलेली नाही. शेतीचे आवर्तन करण्याचे ठरले, तर त्यासाठी पुरेसे पाणी नसल्याने कमी कालावधीचे आवर्तन होणार, हे मात्र नक्की. सध्या तरी सगळीच वाऱ्यावरची वरात सुरू आहे. 

आठमाही "कुकडी'चे उन्हाळ्यात दोन आवर्तने होणार, ही मोठी गोष्ट आहे. मात्र, सुटणाऱ्या आवर्तनातील महत्त्वाच्या अडचणी लवकर सुटल्या नाहीत, तर "आले पाणी.. गेले पाणी' असे होण्याचीही भीती आहे. शनिवारी आवर्तन सुरू, एवढीच माहिती मिळत आहे. त्याचा हिशेब अजून आलेला नाही. त्यामुळे हे पाणी देण्याचे नेमके नियोजन कसे आहे, याबाबत अनिश्‍चतता आहे. त्यात टंचाई आराखडा व प्रकल्पातील राखीव साठा ठरविणारी ऑक्‍टोबरमध्ये होणारी अधिकाऱ्यांची बैठक यावेळी झालीच नाही. त्यामुळे राखीव साठा हा विषय बाजूला गेला आहे. 

पिण्यासाठी पाणी मागितलेले नाही

आताही पुणे, नगर अथवा सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पिण्यासाठी पाणी मागितलेले नाही. त्यामुळे सुटणारे पाणी शेतीचे आहे, असे म्हणण्यास वाव आहे. तथापि शेतीचे आवर्तनाला साधारण साडेचार टीएमसी पाणी लागते. एवढे पाणी उपलब्ध नसल्याने कमी कालावधीत आवर्तनाची कसरत करावी लागणार आहे. आवर्तन कसे असेल, याबाबत कुठलाही अधिकारी खासगीतही बोलायला तयार नसल्याने "सस्पेन्स' वाढला आहे.

समितीच्या बैठकीत काहीही ठरले नाही

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत काहीही ठरले नाही. त्यामुळे आता अधीक्षक व कार्यकारी अभियंता यांच्यासोबत आमदार व स्थानिक सल्लागार समिती सदस्यांनी एकत्रित या पाण्याचे नियोजन कसे करायचे, शेतीला, पिण्याला की पाझर तलावांना द्यायचे, हा निर्णय करावा व त्याचा लेखी आराखडा आवर्तन सुरू होण्यापूर्वी सादर करावा, असा निर्णय होत असल्याची माहिती आहे. 

माजी पालकमंत्र्यांची आंदोलने 

पाण्यासाठी कर्जतमध्ये माजी मंत्री राम शिंदे, तर श्रीगोंद्यात आमदार बबनराव पाचपुते या दोन माजी पालकमंत्र्यांनी आंदोलने केली. पाणी लगेच सोडण्याची त्यांची मागणी होती. तत्पूर्वीच शनिवारी पाणी सुटणार, हेच आश्वासन त्यांना मिळाले. हे दोघेही नेते अनुभवी असल्याने त्यांचे आंदोलने लगेच निकाली काढण्यावर प्रशासनाचा भर दिसला. 
 

असे होऊ शकते आवर्तन 

  • येडगाव धरणातून कालव्यात साडेतीन टीएमसी पाणी सुटणार 
  • एकूण 27 दिवसांचे आवर्तन 
  • त्यात 7 दिवस वहन कालावधी व 20 दिवसांचे प्रत्यक्ष आवर्तन 
  • श्रीगोंद्याच्या वाट्याला 410, कर्जतला 392 दशलक्ष घनफूट पाणी प्रत्यक्ष मिळण्याची शक्‍यता 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com