

अहिल्यानगर : चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एका टेम्पोने चारचाकीसह ८ ते १० दुचाकींना धडक दिली. ही घटना शहरातील मार्केट यार्ड परिसरातील महात्मा फुले चौकात आज (ता. ३) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाल्याने या घटनेची भीषणता दिसून येत आहे.