

Shevgaon Drought Crisis Hits 40 Villages Farmers Struggle With Fodder and Water Shortage and Begin Selling Their Livestock
sakal
-उद्धव देशमुख
बोधेगाव: शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागात यंदा पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिके हातची गेली आहेत. पावसाअभावी विहिरींची पाणीपातळी खालावली असून, हिरव्या चाऱ्याचे उत्पादनही ठप्प झाले आहे. एकीकडे शेतीत केलेला हजारो रुपयांचा खर्च वाया गेला, तर दुसरीकडे जनावरांना जगवायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.